मायेची झोपडी
मायेची झोपडी


माया मायच्या झोपडीत
अंधाराले कंदीलाची साथ आहे
छपन्न भोग नाय
पण भाकरीची आस हाय
थंडी उन वारा पाणी
छप्परातून शिरते
मायच्या लुगड्याची वाकय
मायेची उब देते
सुखा-दुखाच्या क्षणाले
एकामेकाची सावली
सोन्या नान्यानं हाय रिकामी
माणूसकीच्या धन-दौलतीनं हाय भरली
माया मायच्या झोपडीत
अभायभर माया
जणू पंढरीचा विठ्ठल
रखमाईची छाया