एस. टी. (बस)
एस. टी. (बस)
1 min
1.1K
प्रत्येक माणसांच्या सुख-दुःखात
एस.टी. धावून जात असे
कित्येक स्त्रियांच्या बाळाचा
जन्म प्रवासामध्येच होत असे...
माणुसकीचे नाते जपणारे एस. टी.
प्रवासाचे सुख-दुःख जाणत असे
प्रवासासोबतच सामाजिक, धार्मिक
उत्सवामध्ये धावत असे...
कुठे लग्न असो वा यात्रा
एस. टी.ची सेवा सज्ज असे
जवळपास लाखो कर्मचारी
सामान्य माणसांना सुखी, सुरक्षित प्रवास देत असे
शोधूनही एस.टी. दिसेनाशी झाली
सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच बंद झाली
का गं? एस.टी. बाई तू
तुझ्या चालकांना अशी एकाएकी दुरावली...