नदी
नदी
चंद्रभागे तीरी
पंढरपुरी
उभी विटेवरी मंदिरी
मूर्ती सुंदरी।।१।।
आलो सावळ्या द्वारी
दर्शन होता त्वरी
विठ्ठल विठ्ठल महिमा
गातो तुझ्या गजर भारी।।२।।
भाविक जमले
भाव ते सजले
भक्ती ही शक्ती
विठू नामात रमले।।३।।
चंद्रभागा जलात
उतरली लोक जन
न्हाऊन निघाली
पाप, दोष सोडून।।४।।
अफाट पात्र तिचे
भू संपती धाम
जमले भारतीय जन
पंढरपूर क्षेत्र महान।।५।।