हरी रूपे तुझी
हरी रूपे तुझी
सगुणाची साथ! निर्गुणाची जोडी!!
नामातच गोडी! विठ्ठलाच्या!!१!!
हरी रूपे तुझी! दशावताराची!!
जग उद्धाराची! तिन्हीलोकी!!२!!
भजनी, कीर्तनी! नामाचा गजर!!
तेजस्वी प्रहर! दुःखितांचा!!३!!
संसारी मानव! कैवारी जनाचा!!
हरीच्या मनाचा! सेवाव्रती!!४!!
भावार्थदीपिका! तुकाराम गाथा!!
टेकविला माथा! भक्तीभावे!!५!!
चराचरी शोभा! हरीच्या रूपात!!
जीवन प्रभात! समृद्धीची!!६!!
हरी रूपे तुझी! माणसात आली!!
देशसेवा झाली! देवत्वाने!!७!!
स्वर्गसुख लाभे! तुझ्या दर्शनाने!!
मन आनंदाने! तृप्त झाले!!८!!