Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Medha Desai

Inspirational

4  

Medha Desai

Inspirational

अमलात आणा सावरकरांना

अमलात आणा सावरकरांना

1 min
23.5K


इंग्रजांचा मरणयातनांचा जुलूम सोसूनही

सावरकर उदंड देशभक्तीने किती भारलेले

अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा होऊनही

त्यांच्या लेखणीत शौर्याचे प्राण भरलेले १


हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे म्हणून

पहिले पुढारी अशी मागणी करणारे

देशाचे पहिले इतिहास संशोधक जे

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धास गौरवणारे २


परदेशी मालाची होळी, स्वदेशीचा पुरस्कार करून

शत्रूची राजधानी लंडनमध्ये हिंमत दाखवणारे

स्वातंत्र्य संग्रामाकडे जगाचे लक्ष वेधून घेणारे

'मार्सेलिस बंदरातून' धाडसाने उडी टाकणारे ३


जन्मठेपेची शिक्षा क्रूर जुलमाने भोगणारे

तुरुंगात भिंतीवर खिळ्याने महाकाव्य लिहिणारे

अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश देणारे

मातृभाषा, राष्ट्रभाषेचा अभिमान बाळगणारे ४


प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून

'लेखण्या सोडा बंदुका घ्या'असा दिव्य संदेश देणारे

'अभिनव भारत' संघटना उभारणारे

शिखांचा इतिहास लिहिणारे ५


स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव साजरा करणारे

देशभक्तीमुळे बी.ए. ची पदवी गमावणारे

शिवरायांनंतर देव, देश, धर्माची तळमळ असणारे

म्हणूनच सावरकर एकमेवाद्वितीय ठरणारे ६


'सागरा प्राण तळमळला' म्हणत

जाज्ज्वल्य देशप्रेमाचे दर्शन घडवणारे

इंग्रजांच्या जुलमाने होमकुंडात जळत

अलौकिक देशभक्तीच्या लेखणीने तळपणारे ७


असा तत्त्वनिष्ठ, अफाट प्रतिभेचा तेजस्वी तारा

महाकवी हिंदुत्ववादी थोर विभूती

नवचैतन्याच्या स्फूर्तीने उत्तुंग कल्पनाशक्तीचे

प्रेरणादायी जीवनातून देशप्रेमाची अनुभूती ८


अशा एकमेवाद्वितीय विनायकाला

वंदन, सलाम, नमस्कार अपुरेच आहेत सारे

मग 'अमलात आणा सावरकरांना'

एवढेच नुसते म्हणताना स्फुरण चढले न्यारे ९


Rate this content
Log in