गौरवशाली भारत
गौरवशाली भारत
भारतभूच्या वैभवाला इतिहासाची शान
शिवबाच्या तलवारीला गडकिल्ल्यांचा मान!! धृ!!
सुजलाम सुफलाम देश सृष्टीसौंदर्याचा
उत्तुंग हिमालय मांगल्य आणि औदार्याचा
पवित्र गंगा,सिंधु नद्यांना उगमाचे स्थान ...!!१!!
गानकोकिळा आपली भारतरत्नांची खाण
सण,संस्कृती जपताना तंत्रज्ञानाची जाण
स्वातंत्र्याच्या समराचे जगामध्ये गुणगान...!!२!!
चारधामांचा देश तीर्थक्षेत्रांनी सुखावला
काश्मीरच्या नंदनवनाने किती भारावला
देश रक्षणासाठी क्रांतीवीरांचे बलिदान...!! ३!!
विविधतेतून एकता देशाने जपलेली
संतांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झालेली
वंदे मातरम, जन गण मन राष्ट्रगान!! ४!!