Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Medha Desai

Inspirational

3  

Medha Desai

Inspirational

माता रमाई

माता रमाई

1 min
11.9K


कष्टमय तुझे जीवन

त्यागमूर्ती तू माता रमाई

सहनशीलतेची परिसीमा तू

साऱ्या जगाची कणखर आई   १


मृत्यूसत्र नशिबी आले जरी

दुःखाचे चटके वारंवार झेलून

कारुण्य, मायेची पुतळी तरी

उदंड मानवता भरलेली ठासून  २


परदेशात ज्ञानसाधना करणाऱ्या भीमरावांना

दुःखाची झळ जराही पोहोचू दिली नाही

जिद्दीने गरीबीशी दोन हात करून

स्वतःच सदैव आगीत जळत राही ३


भीमराव अधुरे तिच्याशिवाय

हिऱ्याप्रमाणे चमकत होते राखेतून

विद्वान, विश्वरत्न, प्रेरणादायी व्यक्ती घडले

कर्तृत्ववान रमाईच्या त्यागाच्या सेवेतून ४


भीमरावांचा जयजयकार पाहताना

थोडीसुद्धा हाव नव्हती रमाईला

एकावर एक आघाताचे वार सोसूनही

शालीनता, स्वाभिमान होता तिच्या दिमतीला ५


Rate this content
Log in