Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

परिचारिका

परिचारिका

1 min
12.1K


सेवाभाव जिच्या ठायी भरलेला

तीच 'परिचारिका' बनून आली

तनमन सारे कार्यात अर्पण करून

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा झाली १


दिनरात मायेने रुग्णांची काळजी घेऊन

हसतमुखाने त्यांच्या दुःखावर फुंकर घालते

स्वतःच्या जीवाची जराही पर्वा न करता

अविरत रुग्णसेवेत अगदी तल्लीन राहते २


दुसऱ्याला चांगले जीवनदान देऊन

सेवा शुश्रुषा करण्यासाठी तत्पर असते

आपुलकी,माणुसकी, सेवाभावातून

तिची परोपकारी वृत्ती दिसते ३


सहृदय मनाची अखंड सेवाव्रती

देशसेवा,समाजसेवा करणारी

पांढर्‍याशुभ्र वेशातील धडाडीची वीरांगना

वेळेवर रुग्णांना औषधे,दिलासा देणारी ४


रग्णालय हेच आपले घर मानणारी

डाॅक्टरांचा उजवा हात असणारी

आई,बहीण,मुलगी,नातीच्या भूमिकेतून

वेगवेगळ्या रूपाने रुग्णांना आधार देणारी ५


स्वतःचे दुःख,घरातील समस्या विसरून

सेवा शुश्रुषेतच आपले जीवन कंठणारी

सलाम तिच्या या निःस्वार्थ कार्याला

रुग्णालयाच्या कर्मभूमीत तत्परता दाखवणारी ६


'फ्लाॅरेन्स नाइटिंगेल' यांच्या जन्मदिनी

परिचारिकांचा मानसन्मान करू या

मानवता धर्माच्या कर्तव्यदक्ष देवरूपाला

'लेडी विथ द लॅम्प' सन्मान देऊ या


Rate this content
Log in