STORYMIRROR

Medha Desai

Others

4  

Medha Desai

Others

देव नाही देवालयी

देव नाही देवालयी

1 min
23.8K


देव नाही देवालयी

म्हणूनच असिफाचा

क्रूर फडशा पाडला

खेळ झाला जीवनाचा     १


परिस्थिती बदलली

अनुभव जसा आला

सेवा रुग्णांची करून

माणसाचा देव झाला     २


निरागस मुलांमध्ये

देवरूप दडलेले

मतलबी दुनियेत

नराधम घडलेले        ३


पूजा करू माणसांची

देशसेवा करणारे

कष्ट,कर्तव्याचे दूत

संकटात जपणारे       ४


दानधर्म,सेवाभाव

माणुसकी रुजलेली

दया,क्षमा,शांती आता

मानवाने पूजले

ली       ५


देवतुल्य आईबाबा

प्रेमभरे पूजायचे

विश्वासाच्या झर्यामध्ये

देवपण दिसायचे        ६


तेल,दूध वाहू नका

अंधश्रद्धा मोहमयी

अनाथांचे पोट भरा

देव नाही देवालयी       ७


मळा भक्तीचा फुलता

होई दर्शन देवाचे

आदि अंत निसर्गात

दिव्य रूप प्रपंचाचे      ८


देव सारीकडे आहे

चराचरी व्यापलेला

जसा सूर्याचा प्रकाश

चहूकडे पडलेला       ९


Rate this content
Log in