Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Others

3  

Medha Desai

Others

तू नव्या युगाची आशा

तू नव्या युगाची आशा

1 min
11.9K


नवीन तंत्रज्ञानाच्या प्रगतीने

तुझ्या अस्तित्वाची बदलली परिभाषा

उंच भरारीने यशोशिखर गाठलेस

मानवा! नव्या युगाची तू उज्ज्वल आशा १


अंधश्रद्धा,जळमटे आता काढून टाक

आधुनिकतेची तू आहेस नव्या युगाची आशा

स्वबळावर भविष्याचा वेध घेऊन

शिक्षणाच्या जोरावर नाहीशी कर निराशा २


तुला वरदान मिळाले भविष्याचे

आता तरी बदल घडव बदमाशा

अन्याय,अत्याचाराला झुगारून

मुलगा-मुलगी भेदाची नको मुळीच भाषा ३


मानवा!शिक्षण,सदाचाराची कास धरूनच

स्वार्थ,मतलबाचा गुंडाळ आता गाशा

जीवनात माणुसकी,सेवाभाव ठेवून

मायबापांना दाखव उद्याची आशा ४


तंत्रज्ञाना ! तू नव्या युगाची आशा असल्यावर

आबालवृद्धांची चांगली चंगळच झाली

मोबाईल संगणक हाती आल्यावर

मानवाच्या जीवनात ऊर्मी,उमेद आली ५


Rate this content
Log in