Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Inspirational

3  

Medha Desai

Inspirational

आयुष्याला सावरावे

आयुष्याला सावरावे

1 min
11.9K

संकटांवर मात करून

हिंमतीने आयुष्याला सावरावे

नवचैतन्याचा शिडकावा झाल्यावर

खंबीरपणे समृद्ध जीवन सजवावे १

कोणाला आधी, तर कोणाला नंतर

सरणावरती जावेच लागणार

म्हणून आधीच आयुष्याला नीट सावरावे

म्हणजे नंतर कष्टामुळे खंत नाही वाटणार २

आयुष्य म्हणजे सुख-दुःखांचा खेळ

सामंजस्याने, धैर्याने सारे सांभाळावे

तिमिरातून तेजाकडे जाताना

प्रकाशमान विचारांनी आयुष्याला सावरावे ३

जीवनात एखादा छंद जोपासून

प्रगल्भतेने, समाधानाने राहावे

सुखशांतीचा मार्ग स्वतःच शोधून

मनःशांतीने आयुष्याला सावरावे ४

आईने दिलेले सुंदर आयुष्य

माणुसकी, सदाचाराने चांगले घडवावे

सेवाभाव, दानधर्म जीवनात रुजवून

मायबापांचे थोडे तरी पांग फेडावे ५

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational