पावसाचे रूप
पावसाचे रूप
रिमझिम बरसणार्या जलधारांनी
मृद्गंधाचा फाया चहूकडे दरवळला
थंडगार,मनमोहक वार्यासवे तेव्हा
गवताच्या पात्यातून थेंब थेंब ओघळला १
पावसाचे साजिरे गोजिरे रूप
धरतीला ओलेचिंब करते
हिरवाईच्या चैतन्याचे सौंदर्य
तृप्त तृष्णेच्या धारा सृष्टीत भरते २
बळीराजाच्या सोनेरी पिकांतून
धनधान्याची रास भरून गेली
वरुणराजाच्या ओथंबलेल्या सरीतून
आभाळाची माया निसर्गाने केली ३
कधी दुष्काळाने धरती भेगाळली
मग पाण्यासाठी दाहीदिशा फिरायचे
कधी गारपिटीने पिकांची नासाडी
तेव्हा सारे अश्रूंचेच पूर वाहायचे ४
कधी अतिवृष्टीने हाहाःकार माजवून
मग जनजीवनच उध्वस्त व्हायचे
असे निसर्गाचे,पावसाचे रूप बेभरवशाचे
सृष्टीचे सौंदर्यही नष्ट करायचे ५