रक्षाबंधन
रक्षाबंधन
आठवतो तो दिवस बालपणीचा
भावा-बहिणींच्या नात्याचा
रक्षाबंधन म्हणतात सगळे त्याला
नारळी पौर्णिमा म्हूणन गाजतो सण कोळ्याचा
घर भरले होते मामा-आत्यानी
टेबल सजले होते मिठाई आणि विविध राख्यांनी
आईच्या हाताच्या पदार्थांचा वास दरवळत होता
मामाला आईने बांधली राखी
आत्याने बाबांना आरती ओवाळली
एकमेकांना गिफ्ट दिले
गिफ्टपेक्षा त्याच्या नात्यातला गोडवा होता भारी
मी ही ठरवलेलं या वर्षी काही तरी गिफ्ट द्यायचे
नेहमी मी लहान म्हणून दादाकडून मी मिळवे
माझ्या इवल्याशा हातांनी रंगबेरंगी राखी
बांधली दादाला
आणि पळत सुटले मी माझ्या खोलीत गिफ्ट आणायला
मस्त असं कार्ड केले होते मी दादासाठी
चार मोडके शब्द लिहिले होते दादावरती
मध्येच त्याचा एक फोटो चिकटवलेला
कार्ड हिरव्या लाल पिवळ्या रंगानी सजवलेलं
पटकन घेऊन आले मी आणि दिले दादाला
दादाने ते उघडून पहिले
चटकन त्याच्या डोळ्यात पाणी तरळले
हसत हसत तो म्हणाला
माझं गिफ्ट तुझ्या गिफ्टसमोर लहान आहे
तूझ्या इवल्याश्या हातात जादू आहे
आहे मी लकी भेटलीस तू मला बहीण म्हणून
नाही तर या दादाने कोणाला म्हटले असते परी म्हणून