Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

कू.शुभम संतोष केसरकर

Classics

4  

कू.शुभम संतोष केसरकर

Classics

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
23.3K


संकल्प आपल्यातील हा

नवीन वर्षात सामावू

मनामनातील द्वेष आपुल्या

मनातूनच निजवू !! धृ !!


वर्ष आपुले परंपरेचे

वर्ष हे मराठ्यांचे

नाही कधी कोणास कळले

मर्म हे मराठ्यांचे !! १ !!


वसंताची ही पहाट न्यारी

त्यावर कोरोनाची स्वारी

घरात अडकून पडलो आम्ही

तरीही सणांची आम्हास गोडी !! २ !!


मन भरून आज आम्ही

एकमेकांस विचारतो

धावपळीच्या जीवनात आधी

आता आम्ही एकमेकांस शोधतो !! ३ !!


गुढी उभारू देवाची

कार्याची व तत्त्वांची

कर्तव्यनिष्ठ राहू 

आपल्या मातृभूमीशी !! ४ !!


कार्याची घ्या उंच उडी

सोबत कर्माची ही काठी

सोनपिवळा स्पर्श

मंगलमय बनवा ही नाती !! ५ !!


वात्सल्य, ममता, नवं चैतन्य आणा

हितसंबंध नवे घरपण आणा

सहवास लाभला या दिवशी आपणास

मराठी माणसांचा हा सण आला

मराठी माणसांचा हा सण आला !! ६ !!


Rate this content
Log in

More marathi poem from कू.शुभम संतोष केसरकर

Similar marathi poem from Classics