मथुरा बाजारी
मथुरा बाजारी
माठ धरूनी वाट धरूनी जाऊ या लवकरी
जाऊ चला मथुरा बाजारी... मथुरा बाजारी
जाऊ चला मथुरा बाजारी गं मथुरा बाजारी
जाऊ चला मथुरा बाजारी
माठ धरुनी वाट धरूनी... जाऊया लवकरीllधृll
राधे गं तुझ्या माठात सये
काय गं आणलं
बाई... बाई... काय गं आणलं...
दही मी आणलं... भरपूप दही मी आणलं
चला गं चला उशीर झाला जाऊया लवकरी
जाऊ चला मथुरा बाजारीll१ll
राधे गं तुझ्या वेणीत गजरा...
कुणी गं माळला...
बाई... बाई... कुणी गं माळला...
ताईने माळला... माझ्या ताईने माळला...
ताईने माळला... माझ्या ताईने माळला...
करु गं गोळा... फुलांचा सडा... गोकुळ नगरी
चला जाऊ मथुरा बाजारीll२ll
राधे गं राधे पायी पैंजण
शोभून दिसती...
बाई... बाई... शोभून दिसती...
छुमछुम वाजती... पैंजण छुमछुम वाजती
चला गं चला जाऊ सत्वरी
जाऊ चला मथुरा बाजारीll३ll
राधे गं राधे चोळी लुगडी कुणी आणलं
बाई... बाई... कुणी गं आणलं...
बंधुने आणलं... माझ्या बंधुने आणलं
बंधुने आणलं... माझ्या बंधुने आणलं
पदरावर नक्षी सुंदर काठ भरजरी...
जाऊ चला मथुरा बाजारीll४ll
