STORYMIRROR

काव्य रजनी

Classics

3.8  

काव्य रजनी

Classics

बापाचं काळीज

बापाचं काळीज

1 min
23.8K


कधी कुणाला दिसले का

बापाचे काळीज रडतंय का

कधी त्याचं मन झुरतंय का

कधी कुणाला दिसले का...


आई आई सगळे करतात

बापाला मात्र का घाबरतात

बाप ते कधी जुमानतात

कधी कुणाला दिसले का...


घुंगरू बांधून चिमुकली पावलं

नाचत गळ्यात पडती तेव्हा

बापाचा आनंद सांगतोय काय

कधी कुणाला दिसले का...


बापाने केला लेकीचा द्वेष

नकळतपणे रडतोय का

या जन्मात तरी होईल का

कधी कुणाला दिसले का...


बापाने लेकीला सासरी धाडली

त्याच्या काळजाची चाळणी झाली

जिवंतपणी त्याला मरण यातना झाली

कधी कुणाला दिसले का...


लेकीच्या दाराशी उभारला बाप

बापाचा उर कसा भरुनी तो आला

लेकीच्या डोळ्याला होत्या आसवांच्या धारा

कधी कुणाला दिसेल का...


लेक सुखावली म्हणे

बाबा

सदरा शिवला

सासूच्या धाकाने चहा 

कोराच ठेवला जरी होता

घरामध्ये गाईचा तो गोठा

सासू पुढे लेकीचा

तोरा नाही मोठा

कधी कुणाला दिसले का...


बाप म्हणे मनामध्ये मोकलून धाय

माझ्या लेकराला होती 

दुधावरची साय...

कधी कुणाला दिसले काय...


लोक म्हणती बापाचा

जीव लेकीसाठी जळे

अरे पोरांनो तुम्हा त्याचे

धन दौलत आणि रोकडे

बाप कधी कुणामध्ये करी ना अंतर

लेकीवर माया तशी

लेकावर जीव

कधी कुणाला दिसले का...


असा कसा बाप नावाच्या 

देवाचा संग

सात जन्म झाले तरी

फेडू ना ते पांग...

कधी कुणाला दिसले का...


बापाचं काळीज रडतंय का

कधी तो मनात झुरतो का

नाही पाहिले तर जाणून घ्या

एकदा तरी बापाला पारखून घ्या

एकदा तरी बापाला पारखून घ्या...


Rate this content
Log in