STORYMIRROR

Tanuja Inamdar

Classics

3  

Tanuja Inamdar

Classics

पाऊस

पाऊस

1 min
438

कधी तरी वेड्या सारखं

बोलता बोलता बोलून गेले

तू पाऊस हो माझा, होशील?

तू क्षणाचा ही बिलंब न करता हो म्हणालास.. थोड्या वेळात,


चल जायला हवं ग मला आता, म्हणून निघून ही गेलास,

जाताना हळूच म्हणालास वेडाबाई कुठली, पाऊस हो म्हणे माझा,

ते तुझं गालात हसणं पुन्हा तुझ्या प्रेमात पाडणारं, परत एकदा तुझ्या प्रेमात पडलेच.

फक्त आता त्या दिवसापासून तुझ्या येण्याची वाट पाहावी लागते कायम, तू खरंच मनावर घेतलंस, माझा पाऊस होण्याचं?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics