STORYMIRROR

Tanuja Inamdar

Others

3  

Tanuja Inamdar

Others

झाड

झाड

1 min
317


सारी माती गंधाळते

पोटी घेऊन बीजाला

जन्म नव्याने हा होई

रुजवा येई दाण्याला


त्या धरित्रीच्या पोटी

होई पाखर प्रेमाची

ऊब देऊन दाण्याला

देई सावली मायेची


बीज अंकुरते नवे

जोडलेले जमिनीस

झरझर वाढे उंची

झाड येई बहरास


देई सुखाची सावली

उधळण ही फुलांची

ऊन तापू हे लागता

आठवण या झाडाची.


Rate this content
Log in