STORYMIRROR

Varsha Nerekar

Classics

4  

Varsha Nerekar

Classics

आठवतो गाव

आठवतो गाव

1 min
264

सरले जरी सुखद बालपण आठवतात सारे क्षण

खिडकीजवळ जागा मिळवण्यासाठी खूप त्रागा

धावणारी माडाची झाडे मंगलोरी कौलारू वाडे

ठेक्यात चाले बैलगाडी माडा, पोफळीची वाडी

दूर शाळेची घंटा वाजे वंदन दिसता शिवाजी राजे

लाल मातीचा पावला स्पर्श आजोळी जाता मना हर्ष

दारी गंधाळलेली रातराणी आडावरचे थंडगार पाणी

राखणीला पडवीत मोती धान्य भरली कणगी, पोती

चुलीवर स्वयंपाक खास खळ्यावर पसरलेली रास

जात्यावर ओवी गाणारी आई सोवळ्यात घरी विठाई

डोंगरावर मिळे रानमेवाआजीने दिलेला संस्कार ठेवा

गाडीत बसता आठवणींचा पूर, गाव राहिला मागे दूर 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics