वैकुंठाची दिंडी
वैकुंठाची दिंडी
आषाढाची दिंडी| पंढरीला जाऊ|
हरीमुख पाहू| विठ्ठलाचे||१||
मधुर ते नाम| दिनरात घेऊ|
अंतरात ध्याऊ| विठाईला||२||
आषाढी कार्तिकी| करी वारकरी|
पंढरीची वारी| भक्तिभावे||३||
कासे पितांबर| कस्तुरीचा टिळा|
वैष्णव ते गोळा| वाळवंटी||४||
सदा माझ्या चित्ती| दिसे तुझी मूर्ती|
अखंडीत किर्ती| भूमंडळी||५||
मुखी सदा राहो| हरी नाम गोड|
वैकुंठीची ओढ| लागलीसे||६||