शब्दांच्या गर्दीत
शब्दांच्या गर्दीत
शब्दांच्या गर्दीत
अशक्य लिहिणे
तू नसतानाही
भावना जपणे||१||
तू नसतानाही
तुझ्याशी बोलणे
मनाच्या गाभारी
तुलाच पाहणे||२||
तू नसतानाही
आठवांचा सडा
दरवळे मनी
सुगंधी केवडा||३||
रोज तुझ्यासवे
रात्रीस जागणे
तू नसतानाही
सर्वत्र शोधणे||४||
तुजवीण आता
जीवनच नाही
हृदय असुनी
धडधड नाही||५||
तू नसतानाही
तुलाच शोधतो
मनाचा कोपरा
वाकून पाहतो||६||
विरहाच्या राती
कोसळली वीज
तू नसतानाही
भासवते मज||७||

