प्रेम
प्रेम
प्रेम एक संजीवन
हृदयात तेवणारे निरांजन,
प्रेम एक गोड भास
तुझा-माझा एकच श्वास,
प्रेम एक सुखाची चाहुल
नकळत पडलेली मनाला भूल,
प्रेम एक निरंतर नातं
ते न जाणे जात-पात,
प्रेम एक स्पर्श उबदार
वाटे एकमेकांचा आश्वासक आधार,
प्रेम एक दोन मनांचा संगम
डोंगरातून होतसे नदीचा उगम,
प्रेम एक जीवन सरिता
प्रेमाचा पाझर फुटेल अधरा...

