नको करू दु:स्वास
नको करू दु:स्वास
1 min
495
नको करू दुःस्वास कुणाचा
भेदाभेद जीवनी तू टाळ
माणसात माणूस होऊनी
माणुसकी जगी या सांभाळ।
कर्म श्रेष्ठ हेच सांगे धर्म
जाण मनी जीवनाचे मर्म
उच्च-नीच्च ना जगी या कुणी
रक्त एकच, एकच चर्म।
ज्यांच्या नशीबी हाल अपेष्टा
नकोच त्यांची करुस चेष्टा
डोईवरी जे वाहती विष्ठा
नको उपेक्षु तू त्यांच्या कष्टा।
जाती-पातीचा ठाऊक नाही
वाहात्या पाण्याला या विटाळ
पोटासाठी जनसेवा हीच
चाले रोजच सांजसकाळ।
चित्त असावे सदैव शुद्ध
मोठे कर मन हो प्रबुद्ध
नको रे वर्णभेदाचे युद्ध
भल्या भल्यांची जिरली जिद्द।
