STORYMIRROR

Anita Gujar

Others

4  

Anita Gujar

Others

दारूबंदी

दारूबंदी

1 min
378

दारूबंदीसाठी

स्वतः पुढे यावे

व्यसनमुक्तीचे

धडे गिरवावे||१||


या दारूबंदीची

उडवती टर

दारूमुळे बुडे

कित्येकांचे घर||२||


दारूच्या नशेची

लागता चाहुल

दारूबंदीसाठी

उचला पाऊल||३||


व्यसनाच्या कधी

लागू नका नादी

आयुष्याची होते

कधी बरबादी||४||


दारू पिऊनीया 

होऊ नका धुंद

नात्यांचेही मग

तुटतात बंध||५||


सर्व दुःखावर 

नशा हा उपाय

दारूमुळे तुला

होते रे अपाय||६||


सत्याने वागता

नको काही चिंता

नामस्मरणाने

सोडव हा गुंता||७||


त्या हरीनामाची 

चढू दे रे झिंग 

वेगळ्या विश्वात

होशील तू दंग||८||


Rate this content
Log in