बंध नात्यांचे
बंध नात्यांचे
1 min
715
बंध हे नात्यांचे कधी
एकमेका दोष देती,
सारी असती लटकी
पैशापायी बदलती ||१||
जिव्हाळ्याचे नाते जे
मैत्री नाव त्याचे असे,
दुजाभाव मनी नसे
सुखदुःखा वाटीतसे ||२||
मैत्री झंकार पैंजण
मनातले ते गुंजन,
थंड पाण्याचे रांजण
सुखवती ते जीवन ||३||
मैत्री धुंद रातराणी
सदा फुलते अंगणी,
वेड्या माझ्याग या मनी
जागा न घेई ती कुणी ||४||
असे जिव्हाळ्याचे नाते
जसे हृदयी स्पंदन,
जसे हिऱ्याला कोंदण
उभ्या जन्माचे आंदण ||५||
