STORYMIRROR

Anita Gujar

Romance

4  

Anita Gujar

Romance

नवपरिणीता

नवपरिणीता

1 min
507

नवपरिणिता तू विश्ववमोहिनी

रंभा रतीहून अती देखणी

नक्षत्रांचे तेज लोचनी

जणू लाखाची हिरकणी।


माझ्यासाठी तू माहेर सोडलं

हिरव्या चुड्यानं हात तुझं भरलं

माझ्या नावाला नाव तुझं जोडलं

बांधलं गळ्यात सोन्याचं डोरलं।


वास मोगऱ्याच्या गजऱ्याचा भिनला

सडा फुलांचा शेजेवर पडला

रंग इश्काचा डोळ्यात चढला

चंद्र पुनवेचा ढगाआड दडला।


काया तुझी गं संगमरवरी

जसा आरसा छान बिलोरी

काय केलीस जादू सुंदरी

नव्या नवतीची काया मोहरली।


तुझ्या दिलाच्या सिंहासनी

दे स्थान मजला साजणी

ये ना प्रितीच्या अंगणी

होऊनी शुक्राची चांदणी।


मंत्रमुग्ध मी झालो पुरता

पाहुनी हा मौलिक ठेवा

तुजसवे संसार करावा

हेच मागणे आता देवा।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance