सकाळी सकाळी
सकाळी सकाळी
1 min
265
यमुनेच्या तळी सकाळी सकाळी
बासरी कोणी आळविली
मधुर भूपाळी मंजुळ गाणी
साखर झोप कुणी चाळविली||
मंजुळ मधुर नाद पडता कानी
पापणी माझी अलवार उमलली
गंधीत धुंदीत परीमळाने कोणी
प्रसन्न पहाट सारी दरवळली ||
सप्त सुरांनी केली ही किमया
घातली मजला मोहिनी माया
थंड लहरीने वाऱ्याच्या
अवघी मोहरली माझी काया ||
कळलेच ना पायी पैंजणे
आपसात का चुळबुळली,
मोरपिसापरी प्रेमभावना
सर्वांगातूनी सळसळली.||