परतून ये रे भीमा
परतून ये रे भीमा
1 min
232
दलित इथे अजुनी उपेक्षित
व्यथा कथावी कुणा
भीमा परतुनी या हो पुन्हा
बाबा परतुनी या हो पुन्हा
सुज्ञ जनांना इथे कळेना
माणुसकीचा अर्थ
समानतेची भाषा ठरते
जेथे तेथे व्यर्थ
स्वार्थापोटी जो तो देतो
आम्हास खोटी ग्वाही
पाषाणास परंतु जगी या
पाझर फुटला नाही
गटबाजी तटबाजीने
झालो इथे हैराण
नयनी गोठले अश्रू आणि
कंठात रुतला प्राण
कुठवर सोसावी मुक्याने
मानभंग वंचना
मिटता मिटेना वर्णद्वेषाची
कुठेच द्वैतभावना
कुणी ना वाली तुम्हावीण
या दीनदुबळ्या जना
हात जोडोनी तुला विनवते
परतुनी ये रे भीमा
