कोरोना लग्न...
कोरोना लग्न...
कोरोना लग्न आता वऱ्हाड राहा जास्तच सावधान,
शुभमंगल सावधान,
शुभ लग्न वऱ्हाड मास्क लावण्यात मग्न.....!!
मंडपी सुंदरशी कलवरी,
डेटॉलचा गंध दरवळी...!!
नव्हती ओठांवर लाली,
मास्क लावता उठून दिसते गाली,
मेकअप केला हळद, कापूर लावून,
नवरा-नवरी होते अंतर ठेवून....!!
हातात नव्हत्या अक्षता,
सगळ्यांच्या हातावर होती सॅनिटायझरची सुरक्षितता,
हातात घेता मास्क,
मंडपात येता लगेच लावून टाक....!!
मंडपाच्या दारातून नव्हता प्रवेश आत,
सॅनिटायझरची वाट सगळेच पाहत,
टाळली लग्न मंडपात दंगामस्ती,
करता डेटॉल, सॅनिटायझर अन् मास्कची दोस्ती....!!
कोरोना नियम सगळेच होते पाळून,
ना थंड पाणी गरम पाणी पिण्या होते गाळून,
नवरा-नवरी हार नाही चढवले जवळून,
गळ्यात हार टाकले लांबून....!!
शांत निवांतपणे अन् थोड्या भितीने
पार पाडले हे कोरोना लग्न....!!