ओढ पावसाची...🌿🍃🌧️
ओढ पावसाची...🌿🍃🌧️
1 min
48
ओढ पावसाची सगळ्यांना आहे गोड,
शेतकरी राजा आता तू काळजीचा घोर सोड,
ओढ पावसाची आतुरता बरसण्याची,
थुई थुई नाचता चिंब चिंब भिजण्याची...
नव्या पावसाची ओढ,
तन माझे पेटलेले,
वादळ डोळ्यांत भरलेले,
इंद्रधनुष्यरूपी रंग साठलेले...
तारूण्य माझे विश्र्व ते सारे
ओढ पावसाची मित्रपरिवारात मस्त दंगामस्ती करण्याची,
ओढ पावसाची प्रत्येकाला असते हे खरे,
ओढ पावसाची घेता पावसा आता तू बरस रे...
तापलेल्या मातीला ओढ पावसाची होती,
अंगावरील काढून माती हात रे जोडती,
दुभंगली भुई फुगेल रे माती,
पावसा बरस रे बीज अंकुरणं आता तुझ्याच हाती...
ओढ पावसाची प्रीत फुलवायची,
क्षणात भेटता अलगद नाती विणायची,
चातक चकोर गातात गाणी,
पावसाच्या सरी कोसळण्याची असते ती वाणी...
