Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mahendra Kolhatkar

Comedy Others

3  

Mahendra Kolhatkar

Comedy Others

पावसात सुटली तळमळ

पावसात सुटली तळमळ

1 min
115


आलं आभाळ सुटली तळमळ

घर कौलारु कसं सांभाळू

सूचत नाही योजना घरी नाही सजणा...!!१!!


पाऊस येतो धो धो कडाडते वीज

प्रकाश डोक्यावर जीव वाटते कासावीस

जीवाची वाटते भीती घेता येत नाही विश्रांती...!!२!!


पाऊस झाला सुरू बाळ नाही घरी

आई बाळाची वाट पाहात असे दारी

जोरात कडाडली वीज बंद पडले डोक्याचे स्वीच...!!३!!


शहाणा गेला कामावर माहिती नाही कानावर

अश्रुधारा सुटल्या डोळ्याला शहाणा असेल वाटेवर

कोण करणार माझी मदत लोकांची चांगली नाही आदत...!!४!!


माणूस माझा पावसात भिजला जेवण नाही शिजला

माणूस म्हणे मिळाली नाही रोजी घेतली नाही भाजी

ताईने केली चटणी विषय लागले वर्णी...!!५!!


पाऊस येतो जोरात आपल्या ताल सुरात

उफान येते नदी-नाल्यांना सचेत करतात माणसांना

काळजी घेत नाही मणुष्यप्राणी उगीचच होते जीवहानी...!!६!!


अशी कधीच सुटली नव्हती तळमळ

घरात कधीच मचली नव्हती खळबळ

या पावसाने सर्व करुन ठेवली गडबड...!!७!!


Rate this content
Log in