Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahendra Kolhatkar

Fantasy

3  

Mahendra Kolhatkar

Fantasy

माणसाला पंख असते तर...

माणसाला पंख असते तर...

1 min
43


माणसाला पंख असते तर...

जगात निःशुल्क फिरला असता

चंद्रावर जाऊन माहिती आणली असती

उगीचच मरणाची भीती राहिली नसती...!!१!!


माणसाला पंख असते तर...

खूप काही केलं असतं

लाॅकडाऊनमध्ये बाहेर नसतं

आज परिवारासोबत असतं...!!२!!


माणसाला पंख असते तर...

विमान आणि वाहतूक सेवा नसती

सुरक्षाबल तैनात नसून घातली नसती गस्ती

आपसात नसते युद्ध आणि मस्ती...!!३!!


माणसाला पंख असते तर...

माणूस असता निरोगी

पक्ष्यांसारखा असता जोगी

पक्ष्यांचे कुणीच नाही सहयोगी...!!४!!


माणसाला पंख असते तर...

माणूस मोहमायेपासून असता दूर

भेदभाव करुन झाला नसता निष्ठुर

कुणी नसते सवार सर्व असते बहादुर...!!५!!


माणसाला पंख असते तर...

आकाशावर निर्भयपणे फिरला असता

पर्यावरणावर आली नसती गदा

जीवन जगला असता साधा...!!६!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy