८ मार्च महिला दिवस
८ मार्च महिला दिवस


महिला म्हणजे आई माया ममतेची
प्रेम करते सर्वांवर समतेची
तिच्याकारण हा जग सावरला
महिला दिवस ८ मार्च निवडला!!१!!
प्रत्येक महिलेच्या मागे आहे पुरूषाचे हात
देतो अख्या आयुष्यभर जीवनाची साथ
महिला नसती जगात तर पुरूष नसते
आज पॄथ्वीच्या पाठीवर कुणीच नसते!!२!!
महिलांचा सन्मान अवश्य असू द्या
त्या आपल्या माते समान आहेत
जगू द्या त्यांना मोठ्या सन्मानाने
पुरूषांचा दॄष्टीकोन असावा गर्वाने!!३!!
आधीच्या काळा
त महिला घरातच वावरली
विज्ञानाच्या युगात महिला पूर्ण सावरली
माता सावित्रीच्या प्रयत्नाने मिळाले शिक्षण
आज महिला पुरूषाशिवाय करते स्वत:चे रक्षण!!४!!
वैचारिक पातळी जरी आहे वेगळी वेगळी
महिला-पुरूष आहेत एकसमान
कृपा दृष्टी आहे फुले शाहू आंबेडकरांची
भारतीय लिखीत राज्यघटना संविधानाची!!५!!
जगात आज महिला चालली समोर
आयुष्याचे निर्णय घेते खंबीर
प्रत्येक विभागात लावते नंबर
कर्तृत्वाने मिळते महत्त्वाचे चेंबर!!६!!