आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म
कालांतराने मिळाला मानव जन्म
माणसाचे होत नाही पुनर्जन्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!१!!
महात्म्यांचे विचार खरे गुणधर्म
अनाथांची सेवा करणे मानवधर्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!२!!
सामाजिक संस्कार मानवीय धर्म
क्रुरता माणुसकीचे अधर्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!३!!
जीवन आहे अनमोल नको जुर्म
गरजुंना घडविणे खरे सत्कर्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!४!!
प्रेमाने जिंकुनी मनं नाही कुकर्म
सत्याच्या मार्गाने मिळतं पुण्यकर्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!५!!
माणसाला नाही दया धर्म निर्मितो अणुबॉम्ब
महाविनाशक आहे परमाणु बाॅम्ब
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!६!!
आतंकवाद करणाऱ्याना नाही शर्म
नाबालिकेवर करतात अत्याचार बेशर्म
आयुष्याचे टिकट आहे कन्फर्म..!!७!!