मृत्यु
मृत्यु


मृत्यू तू आहेस काल्पनिक
तुला नाही कधी वेळ काळ
तुझ्याजवळ नाही चालत दयेची अर्जी
कुणाला केव्हाही घेऊन जातोस तुझी मर्जी!!१!!
कधी बहाणा करतोस कॅन्सर अल्सरचे
कधी म्हणतोस शुगर बीपी कधी हार्ट अटॅक
तर कधी सांगतोस किडणी फेल लिव्हर फेल
इथे चालत नाही कुणाची सत्यता आहे मृत्युची!!२!!
सजा देतोस वात लकव्याच्या रुपाने
माणूस असतो दोषी मृत्यू ठरतो निर्दोषी
मृत्युला बंधन नाही वयाचे गोष्ट आहे खरोखर
मृत्यू आहे महाशक्ती करणार नाही कुणी बरोबर!!३!!
कुणी असते उपाशी तापाशी
कुणाला असते खोकला खासी
मृत्यू पाहात नाही कोण कुणाचे सगे
डॉक्टर हकीम पडतात मागे जात नाही मृत्युच्या मार्गे!!४!!
जगण्याची असते इच्छा आकांक्षा
मृत्यू करित नाही कुणाची रक्षा
मृत्यू करित नाही कुणाची पर्वा
मृत्यू आहे अटळसत्य सर्वेसर्वा!!५!!
मृत्युला मान्य नाही पदभार
कोणी कलेक्टर कमिशनर असो
मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती असो
मृत्युत नाही बदल मृत्यु आहे अटळ!!६!!