आईचे प्रेम
आईचे प्रेम


आई सोन्याची खाण आहे
तिच्याशिवाय विखुरली जान आहे
आईची नाही जाती तीचे सन्मान आहे
तेव्हा तर जग आईवर कुर्बाण आहे...!!१!!
आई साऱ्या जगाची ममता आहे
तिच्यात लाभली अखंड समता आहे
आईने जन्मली अनेक विरांना
अचुक आहे तीचा निशाणा...!!२!!
आईसारखी नाही कुणी बाई
भेद करतो मुलांचे मावशी बाई
निसंकोच मुलं करतात घाई
आठवतात आपली आई...!!३!!
आईने घडविले अनेक कलावंत
आई झाली मोठी शहाणी
तीच्यात आहे तसी वाणी
राजा झाले हरिश्चंद्र तारा झाली राणी.!!४!!
त्याकाळी आई होती घर राखी
तिला नव्हता जान कुणाचा
त्रास होता आपल्या सुनांचा
सून बाहेरची मुलगा होता खुणाचा...!!५!!