आजचा शेतकरी
आजचा शेतकरी


आजचा शेतकरी
नशीबी त्याचे दारीद्री
आणतो उधारी
कुणी नाही कैवारी
सुखात आहे शेजारी...!!१!!
आजच्या शेतकऱ्या नशीबी
नाही सुखाची सावली
वसुंधरा म्हणे माऊली
केली आजपर्यंत रक्षा
कारणवश मिळतं शिक्षा...!!२!!
आजचा शेतकरी म्हणे
सुखी आहे भिकारी
समाजात त्याची सिदोरी
शेतकरी राब राब राबतो
रिकामी आहे तिजोरी...!!३!!
आजचा शेतकरी वफादार
रात्रंदिवस गाडतो घाम
मिळेना श्रमाचे दाम
कोण ठरतो जवा
बदार म्हणे
केली नाही शेती खबरदार...!४!!
आजचा शेतकरी म्हणे
शाहुकार दादा पडतो पाया
शेती माझी जाईल वाया
तीडतीड घटणार माझी काया
पीकु दे शेती कर माझ्यावर माया...!!५!!
आजच्या शेतकऱ्याची आत्मकथा
सरकार म्हणे करतो वादा
करणार पूर्णच कर्ज माफ
लवकर करतो कायदा
आयुष्य संपल्यावर मिळेल फायदा...!!६!!
आजचा शेतकरी
दाखवतो ईमानदारी
जगतो जीवन मुशाफिरी
निर्दयी करतात गहूहत्या
शेतकरी करतो आत्महत्या.!!७!!