STORYMIRROR

Ravindra Gaikwad

Comedy Others

4.2  

Ravindra Gaikwad

Comedy Others

कविता

कविता

1 min
66


कवीचं कवीतेवर एवढं प्रेम असतं की,

त्याची बायको ही तिच्यावर जळायला लागते.

म्हणते,माझा नाद सोडून तिच्यामागे लागलाय

म्हणते, नशीबच वाईट हा वेडा पदरात पडलाय.

फक्त तिला नी त्यालाच ते माहित असते

त्याची ती एक कविता ऐकूनच ती त्याच्या प्रेमात पडलेली असते.

मला एकच सांगायचे आहे की,आमची बायको देखील त्याच कवितेची देण असते.

बरं झालं नशीबच मोठं आमचं

कशीतरी एखादी ही कविता सुचते...

नाही तर आम्हाला कोणी बायको ही दिली नसती

अन् आमच्यावर बिगर बायकोचच एकटं राहण्

याची वेळ आली असती.

म्हणून बायकोलाच म्हणतोय गोडीनं

गुपचुप रोज एक कविता ऐकून घेत जा,

लईच आवडली मनाला तर जवळ जरा येत जा,

तेवढ्यावर ही मन नाही भरलं तर गोड गोड पप्पी देत जा.

तिचा आणि माझा दोघांचाही लईच राग आला तर दूर जाऊन झोप जा.

मला माहित आहेच एकदाचं तू सोडशील मला पण ती मला सोडणार नाही.

मी तिला सोडणार नाही.

पण नाईलाज झालाय माझा...

आई शपथ खरंच सांगतो आजपासून यापुढे चुकूनही एकही कविता लिहीणार नाही

कारण मला माझ्या बायकोशी अजिबात भांडण परवडणार नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy