जादू तुझ्या ग रुपाची...
जादू तुझ्या ग रुपाची...


सौंदर्यांची खाण ग पोरी तू
किती किती छान, गोरी गोरीपान तू
दिसायला देखणी,चंद्राची चांदणी
विसरुन भान मी, पाहून परेशान मी
टकमक तुलाच ग पहात राही
जादू तुझ्या ग रुपाची,
मला झोपच येत नाही...
गोल गोल टपोरे तुझे डोळे
छत्तीस नखरे नी किती चाळे
गोड गोड बोलतेस, तुरुतुरु चालतेस
भुरूभुरू उडतात केस काळे
बघतेस काय,नी हसतेस काय
तुझ्या विना काही ग सुचत नाही....
गोड गुलाबी ओठ तुझे
नाजूक, सुंदर रुप साजे
>
गालावरती तिळ नी खळी
तू हसून गाली का ग लाजे
ध्यानी मनी तूच राणी,
दुसरं काहीच दिसत नाही...
पाहून तुझी ही न्यारी अदा
झालो तुझ्यावर मी पोरी फिदा,
येशील का माझ्या मिठीत राणी
देशील का ग तू चुंबन एकदा
तुझ्यासाठी सारं काही
मी बापाला कुणाच्या भीत नाही...
रंग रूप तुझं ग लई गोड
लागली मला तुझी ओढ,
हवीस मला ग तुच राणी
तुझी माझी जमेल जोड
तू म्हणजे माझं जीवनच सारं
तुझ्या विना जीवनात सुखच नाही...