STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

माणूस कुठे गेला

माणूस कुठे गेला

1 min
190

माणूस चंद्रावर गेला काय 

नी सूर्यावर गेला काय...

तो माणूस असला पाहिजे

हैवान नाय, हैवान नाय...


निघायचा इथे सोन्याचा धूर

आता वाहतोय रक्ताचा पूर,

आपणच ओळखत न्हाय

आपलीच बहीण ,आय...


प्रगती, अधोगती कळलीच नाही

स्वार्था पुढे काही उरलंच नाही,

खोटाच इतिहास आहे साक्षीला

जगातच नाही गरीबांना न्याय...


दूधाचे दूध,नी पाण्याचे पाणी

बदलला काळ, जुन्या झाल्या म्हणी,

खऱ्याची माय, वनवासाला जाय

येत नाही आता दूधावर ही साय...


भल्या बुऱ्याची हवी जाण

वाटे व्हावे जगाचे कल्याण,

घालून हातात हात चालावे

ओढू नये कोणी कुणाचे पाय...


माणूसकी हवी माणसात

नको तो धर्म, जातपात,

व्हावेत दूर भेदभाव सारे

जगाला हवी समता, न्याय...


भरत आला पापाचा हंडा

कोणीही घेई कोणता झेंडा,

ज्याचं त्याचं वेगळं राजकारण

नको तिथे राजकारण करायचे नाय...


स्वार्थी, बेगडी दुनिया सारी

सारेच पापाचे वाटेकरी,

सत्याने वागा,माणसांपरी जगा

देवापाशी आहे साऱ्यांचाच न्याय...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract