रात्र कोजागरीची
रात्र कोजागरीची
लागू नये ग मुळीच आज
दृष्ट चंद्रास चांदणीची,
खुलून दिसे किती ही
खळी तुझ्या गालावरची
लागली ग ओढ राणी
फार आज मिलनाची,
जागून काढू दोघं ही
रात्र कोजागिरीची...
यालाच म्हणावयाचा
दूग्धशर्करा योग,
हवी तुला का गं
मिठी साजनाची..
वाढेल की गं गोडी
आज तुझ्या ओठांची,
ओढ लागली कशी
साजनांस सजनीची..
ही अविस्मरणीय म्हणावी
रात्र कोजागिरीची,
चांदण्यात बहरावी
प्रीत आपल्या दोघांची..
चल छतावर जाऊ
दोघे एक होऊ,
गरज खरी आज
आहे चंद्रास चांदणीची..
हे शुभ्र चांदणे किती
कोजागिरीच्या राती
अविस्मरणीय म्हणावी
ही मजा मिलनाची...