STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy

महागाई.

महागाई.

1 min
223

महागाईने गाठला कळस

सांगा होईल देशाचं कसं?

याला म्हणतात का विकास

झालं सरकार वेडंपिसं...


झालं गरिबांचं अवघड जीनं

गॅस वाढला कित्येक पटीनं,

कसं घ्यायचं चांदी अन् सोनं

देईल पोरगी गरीबांघरी कोण ?


खत, बियाणाचे वाढले भाव

शेतकऱ्यांने जगावं की मरावं ?

कसं गरीबांनी पोट भरावं ?

मोल मजुरांनी काय खावं ?


वाढली गरीबी अन् बेकारी 

त्यात महागाई आली सारी,

खाजगीकरणांत गेली नोकरी

तरुण शिकून झाले भिकारी.


पेट्रोल, डिझेल वाढलंय फार

जी.एस.टीचा सर्वांना भार,

महागाईने साऱ्यांना केलं ठार

जीवावर आमच्या उठलं सरकार.


गरीब झाला जीवावर उदार

महागाईत कसा करावा संसार?

कशाने आणायची तेल, साखर?

रोजच होई उपासमार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract