सहवास
सहवास
सहवास तुझा खास
आठवून गेला मनी
नयनी ओघळी अश्रू
ताज्या झाल्या आठवणी ||१||
स्पर्श तुझ्या हा प्रेमाचा
हृदयी स्पंदने होती
भेटण्याची आस लागे
मन माझे बावरती ||२||
भावनेने होतो जीव
तुझ्या मागे वेडापिसा
सावरतो मी स्वतःला
जाहलो मी असा कसा ||३||
तुझी सोबत म्हणजे
जनु लहरी पाऊस
सरसावे वाऱ्यासंगे
भेटण्याची मनी हौस ||४||
वाटते मजला भीती
तुजला गमविण्याची
सहवास लाभो तुझा
ही इच्छा माझ्या मनीची ||५||
