STORYMIRROR

Roshani Shinde

Abstract

3  

Roshani Shinde

Abstract

संमिश्र

संमिश्र

1 min
554

ढळणाऱ्या सांजवेळी

मला निमित्त ठरवून

भरून आलेले नभ 

साक्षीला उधळणारे तेजतरंग


नेहमीच्या विसाव्याची जागा

समूळ नसल्याचा ठावठिकाणा

घारीचे कर्कश आवाज विसरून

संथपणे पहडून न्याहाळणे


दुसऱ्या बाजूला आकाश निरभ्र

कोणत्याही भावनेला समावणारे

त्याच्याच रंगात विरणारे धागे

अजूनही शोधण्याच्या मी प्रयत्नात


आकाशाने एकच सुर लावावा

नजरेची तारंबळ सोडवावी आता 

मग रिमझिम सुरू व्हावी

भुईला कानगोष्ट सांगता यावी


इतक्या संमिश्र भावनांच्या आकाशातून

विजांच्या कडकडांसकट बरसणारा पाऊस

तृणपात्यावर निर्माण झालेले दव

नेमक्या कोणत्या भावनेचे प्रकटीकरण असावे?


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

More marathi poem from Roshani Shinde

Similar marathi poem from Abstract