बारा ज्योतिर्लिंग
बारा ज्योतिर्लिंग
सौराष्ट्राचे सोमनाथ
सोमनाथ देवालय
सोमाने केली स्थापना
असे सोमाचे आलय ||१||
रुसला हा कार्तिकेय
भेटला मल्लिकार्जुन
श्रीशैल्य पर्वती असे
म्हणुनी मल्लिकार्जुन ||२||
असे महाकाळेश्वर
प्रसिद्धीचै शिवालय
स्वयंभू अतिप्राचीन
रुद्ररुपी शिवालय ||३||
नर्मदेच्या बेटी असे
डोंगरी अमलेश्वर
नर्मदेचा असा भाग
हे ओंकार अमलेश्वर ||४||
वैद्यनाथ चिंता भूमि
हा परळया वैजनाथ
मिळते रोगास मुक्ती
हा परळी वैजनाथ ||५||
भीमाने केला वध हा
म्हणुनी भीमाशंकर
आसाम प्रांती वसले
म्हणुनी भीमाशंकर ||६||
दक्षिण भारता असे
रामेश्वराचे मंदिर
रामरायाने स्थापिले
दर्शन घेण्या अधीर ||७||
नागेश दारुकावने
असे द्वारके जवळ
ओढा असे नागनाथा
असे स्टेशन जवळ ||८||
वाराणसीचे प्रसिद्ध
नाव काशीविश्वेश्वर
जगाच्या काळात असे
त्रिशूलधारी शंकर ||९||
ब्रह्मगिरी पर्वतात
वसलेले त्र्यंबकेश्वर
याची वैशिष्ट्ये असती
ब्रह्मा विष्णू महेश्वर ||१०||
नदीला केदारनाथ
असती पवित्र स्थान
हिमालयात हे स्थित
ज्योतिर्लिंग हे महान ||११||
वेरूळी हे घृष्णेश्वर
लेणे वाढवली शान
तयाची महती असे
महाराष्ट्रा अभिमान ||१२||
