महिषासूरमर्दिनी
महिषासूरमर्दिनी
महिषासूरमर्दिनी
आसुरांना मारीतसे
जगी दुष्टांचा संहार
त्वरितचि करीतसे
भक्त पूजिती तुजला
श्रद्धा भक्ती मनोभावे
करी रक्षण तयांचे
संकटांना निर्दाळावे
जगामधे दुष्टजन
माजविती कोलाहल
करी तयांचा संहार
मनी दाटे गलबल
नवरात्रामधी भक्त
पूजा षोडषोपचारे
व्हावे प्रसन्न भक्तांसी
कृपाछत्र आयुभरे
