STORYMIRROR

Anala Bapat

Abstract Inspirational

3  

Anala Bapat

Abstract Inspirational

जरा जगून घे

जरा जगून घे

1 min
411

जगलास खूप तू दूसऱ्यांसाठी,

क्षणभर विश्रांती जरा करून घे,

झिजलास खूप तू पैशांसाठी

उपभोग त्याचा थोडा करून घे.


मुठीतल्या रेती सारखे बघ,

निसटत चालले आयुष्य हे

आप्त जनात रमून क्षणभर

मौल्यवान वेळ ही करून घे


कशाला धडपड ह्या कामाची

काम काही उद्यावर ठेवून दे,

नाच कधी तरी पार्टीविना असाच

संगीतात स्वतःला कधी झोकून दे.


समोर आरश्याच्या क्षणभर,

असाच बैस कधी तरी शांत

अबोल संवाद स्वतः बरोबर

करून तर बघ एकदा निवांत


क्षणभंगूर हे जीवन आपले

कामे पूर्ण मनाची करून घे

येईल मृत्यू तेव्हा मरु मित्रा

आजतर जीवन पूर्ण जगून घे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract