प्रत्यक्षाचे प्रात्यक्षिक
प्रत्यक्षाचे प्रात्यक्षिक
अंतिम सत्याच्या शोधात गुंतलो
परतीची वाट विसरलो
रस्ता संपेल असे वाटले होते
चालत राहिलो धडपडत राहिलो
परतीची वाट विसरलो
वेळ आपल्या वेगाने पळत राहिली न थांबता
तिला ना काळजी माझ्या क्षितिजावर उगवणाऱ्या मृगजळाची
अंतिम सत्यशोधक मनाची
ते अंतिम अबाधित क्षेत्र म्हणे तुका ज्ञानेश्र्वर
पहिले ह्याची डोळा भोगिले ह्याची देही
मग मीच का बघू शकत नाही
का निसटून जाते मुठी तुन जितके ते
मनात घरटे बांधून वादळात पडावे तसे
हा उभा जन्म व्यर्थ ठरेल का उगा
की अंतिम सत्य तसे काही नसे
हेच सत्य तर नसाव?
बोधिवृक्षा खाली झोप लागली
वेळ संपली होती
ना जाणीव त्याची मला झाली
सत्य माझया समोर होते कळले तेव्हा
दृष्टिकोन दृष्टीने हरवला होता
फक्त प्रकाश अंधाराच्या शोधात होता
अंधार ही प्रकाशाच्या भीतीपोटी सरकत होता
हे सृष्टीचक्र जन्म मरण कर्ज आणि व्याजही
न फिरणारे गणित सत्य सत्य सत्य
