STORYMIRROR

Baljak

Tragedy

3  

Baljak

Tragedy

मित्रत्वम सत्यम

मित्रत्वम सत्यम

1 min
360

पण म्हणायचे मित्र ह्यांना

मानायचे दोस्त ह्यांना

सतत स्पर्धा डोक्यात ह्यांचा 

वरचढ तोरा ह्यांच्या


सहनुभती दाखवायला 

नेहमी असती प्रथम

 अन तत्परतेने 

पाडतील देखील पायात अडकवून 

पाय सतत

संकटात म्हणतील साहाय्य करू आम्ही

पण संकटात पाडुनच मदत

अगदी शेवटच्या घटकेला येति

पण ज्ञानेश्वरी ऐकविती खटक


म्हणावे मित्रच ह्यांना म्हणावे दोस्तच ह्यांना

उपदेशाचे झरे 

ह्यांच्याच मालकीचे

 सत्यवान दानी देशभक्तीचे धर्मायुक्त 

ठेकेदार जणू


ह्यांची बाजू ना घेता 

देश द्रोही धर्म द्रोही ठरतो आम्ही 

पण मित्र ह्यांना म्हणतो आम्ही


शब्दांचे खेळ हे सारे जिव्हाळाचे नाटक

माझ्या कडे मर्सिडीज तुज्या कडे स्कूटर च

वरून दिलासा

 पार्किंग चा त्रास नाही ना म्हणून


म्हणती मित्र ह्यांना आम्ही


बुद्धीचे दिवाळे निघाले हे व्हाट्स अप आले उपयोग फार अति झाला 

निवांत निष्पाप मैत्रीचा मार्गच अडला

पचनी ना पडेना ही कुरघोडी 

चमच्यांची झाली चैना 

अभिमान्यांची झाली दैना 


विषयांचे ना ह्यांना ज्ञान ना अभ्यास

 पण मत डोक्यावर लादून शांती हरवून लोकांची

स्वतः द्वेषर्पण आध्यत्मिक प्रक्षेपण चालविता मित्र म्हणती आपण


लोका सांगे ,,,,,,,

आपण मात्र कोरडे ,,,,,,,

पण मित्र आमचे शेवटी दात आणि ओठ 

आपलेच मित्र म्हणती आपण


काय करावे हे सुचेना

भविष्यातील इतिहास उजळेना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy