STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

चूक

चूक

1 min
328

चूक असो वा गलती वा असो ती मिस्टेक,

चांगुलपणा ही वाईट ठरतो,याच्यामुळे तो थेट.


मनात नसता काही घडते, तेच प्रथमदर्शनी खरे वाटते,

विचार करूनही नाही कळते, चूक कोणती ,कशी होते,


सांगायाचे एकच आणिक, योगायोग तो होता,

काय जाहले कसे जाहले , फांदी तुटली ,कावळा बसता,


होती इच्छा हीच मनी, शुद्ध तात्त्विक चर्चेची,

ना की कोणाचे आयुष्य खाजगी, येथे रंगविण्याची,


स्वप्नी ही ना कधीही जमले, तोडणे मन हे कोणाचे,

मात्र जाहले व्यथित अंतकरण, बोल ऐकूनी कोणाचे,


वाटले, मिळाली परत ही शिक्षा, न केलेल्या चुकीची,

हातात नसते काही आपल्या, इच्छा ही त्या देवाची.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract